¡Sorpréndeme!

Dinesh Karthik चा हा खराब विक्रम | Lokmat News

2021-09-13 183 Dailymotion

भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला. लंकेने 3 गड्यांच्या मोबदल्यात हे सोपे आव्हान पार करत भारतावर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
सामन्यात भारताचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. या सामन्यात सर्वात खराब कामगिरी झाली ती दिनेश कार्तिकची. कार्तिक 18 चेंडू खेळला मात्र एकही धाव काढू शकला नाही. या कामगिरीमुळे त्याच्या नावे एक खराब विक्रम नोंदवला गेला आहे. इतके चेंडू खेळून शून्य धावेवर बाद होणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी  एकनाथ सोलकर 1974 साली इग्लंडविरूद्ध खेळताना 17 चेंडू खेळून शून्यावर बाद झाले होते. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews